नमस्कार मित्रांनो दिवाळी आधीच केंद्र सरकारने पेन्शनकर्त्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. लोक शिकायत, कार्मिक आणि पेन्शन मंत्रालयकडून एक सर्क्युलर समोर आलं आहे. यामध्ये पेन्शन उपभोगत्यांना अनुकंपा भत्ता नावाने जास्तीची पेन्शन मिळणार आहे पेन्शनचा लाभ केवळ 80 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात.
80 वर्षाखालील व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. पेन्शन मंत्रालयाने 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी सरकारच्या सिवील सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला घेऊन नवीन निर्देशपत्रक जारी केली आहेत. अतिरिक्त भत्ते वितरित करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली आहे.
सीसीएस पेन्शन नियम 2021 च्या 44 उपनियमाच्या सहाव्या प्रावधानांनुसार ज्येष्ठ नागरिकांना 80 वर्ष झाल्यानंतर किंवा 80 वर्ष होऊन गेल्यानंतर नियमावलीनुसार अनुकंपा भत्ता देण्यात येणार आहे.85 वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या 20 टक्क्यांसाठी पात्र आहे. त्याचबरोबर 85 ते 90 वर्षांच्या पेन्शन उपभोक्त्यांसाठी 30% तर, 90 आणि 95 वर्षांच्या ज्येष्ठांसाठी 40 टक्के पात्र आहे. 95 ते 100 वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के मिळणार. त्याचबरोबर शंभर किंवा शंभरहून अधिक बॉय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मिळणार.