सरकारने खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये भाव देण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी लातूरमध्ये केली. मात्र, कापूस प्रतिक्विंटल की प्रति हेक्टरी द्यायचा, हे अद्याप ठरलेले नाही. हे पैसे 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.