शासनाच्या या नवीन निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .त्यासोबतच पहिल्या शासन निर्णयानुसार जास्त मुद्रांक शुल्क लागत असल्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती ही कुमकुवत होत चालली होती यामुळे या नवीन शासन निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा फायदाच होणार आहे.Land Record
Land Record : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की, वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील खूप वाया जातो. त्याचबरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जातो. या सोबतच वडिलोपार्जित जमीन Bhoomi Land Record मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयानुसार तुम्हाला फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरून जमीन तुमच्या नावावर करता येणार आहे.