नमस्कार जिल्हा परिषद आणि राज्य पशुधन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत अनुदानाद्वारे दुग्धजन्य जनावरांचे वाटप केले जाते. सर्वसाधारण वर्गाला ५० टक्के आणि एससी-एसटी वर्गाला ७५ टक्के सबसिडी दिली जाते.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुग्ध प्राण्यांचा गट दिला जातो. ज्यामध्ये 75 टक्के म्हणजे गाय गटासाठी 1,17,638 रुपये किंवा म्हैस गटासाठी 1,34,443 रुपये दिले जातील. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
इथे क्लिक करून बघा योजनेला अर्ज कसा करायचा
पात्रतेचे निकष
लाभार्थी अनुसूचित जाती किवा जमातीतील असावा.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य.
अत्यल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार असावा.
पशुधनाच्या विकासाला गती देण्यासाठी, पशुधन विभाग दुग्धजन्य जनावरांसाठी 75 टक्के अनुदान वितरीत करतो. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग प्रयत्न करत आहे.