असा व्यवसाय सुरू करा
हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरीच सुरू करू शकता. जर तुमच्या घराचे लोकेशन योग्य नसेल, तर तुम्ही अधिक सुलभ ठिकाणी दुकान भाड्याने घेऊन आईस्क्रीम पार्लर सुरू करू शकता. याशिवाय 400 ते 500 चौरस फूट कार्पेट एरियाची कोणतीही जागा आईस्क्रीम पार्लर उघडण्यासाठी पुरेशी आहे. यामध्ये तुम्ही 5 ते 10 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था देखील करू शकता.
तुम्ही अमूल फ्रँचायझी देखील घेऊ शकता
अमूल आईस्क्रीम पार्लरसाठी किमान 300 चौरस फूट जागा आवश्यक आहे. तुमच्याकडे जागा उपलब्ध असल्यास, तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी [email protected] वर ईमेल करणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकला भेट देऊनही माहिती मिळवू शकता.