सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! खाद्यतेलाच्या किंमती झाल्या कमी इथे बघा आजचे नवीन दर

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम या तेलाची आयात वाढली. शिवाय यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. शिवाय विदेशातील उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. मलेशिया, इंडोनिशियात पाम, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिनामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळेच खाद्यतेलाचे दर घसरून तीन वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आले आहेत. दुसरीकडे शेंगदाण्याची निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत या तेलाचे दर कमी प्रमाणात घसरले.

 

खाद्यतेलाचा किरकोळ भाव तक्ता:

• खाद्यतेल सध्याचे भाव तीन महिन्यापूर्वीचे भाव

• सोयाबीन ११० १२०

सूर्यफूल १२० १३०

• राईस ब्रान ११० १२०

• पाम ११० १२५

मोहरी १४० १५०

• जवस १२० १३०

शेंगदाणा १७० १७५