एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर.! आता घरबसल्या काढता येणार मोबाईल वरून ऑनलाईन तिकीट

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यांत राज्यातील १३ लाखांहून अधिक तिकिटाची विक्री या ऑनलाइन आरक्षण प्रणालीतून झाली आहे. मागील वर्षी या पाच महिन्यांत पावणेदहा लाख तिकिटांची विक्री झाली होती.

 

हे सुद्धा वाचा : आधारधारकांसाठी मोठी माहिती.! मोफत आधार अपडेट करण्याची ही आहे शेवटची तारीख, इथे करा मोफत आधार अपडेट

 

सोलापूरसह राज्यभरातील १० हजार प्रवासी दररोज या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीने तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करून ते अद्ययावत करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला मोबाईलद्वारे घरबसल्या सहजपणे ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल, अशी सोय त्यात करण्यात आली आहे

ऑनलाइन प्रणालीद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्तींना देखील सवलतीतून आगाऊ आरक्षणाचे तिकीट मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Comment