विद्यार्थ्यांसाठी आली खुशखबर.! विद्यार्थ्यांना मिळणार आता सर्वे दाखले घराजवळ, इथे बघा कसा करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो बारावी आणि दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकाराचे दाखले लागतात. ते त्यांना वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज झाले आहे.

त्यासाठी सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महा ई-सेवा केंद्रात जाऊन अथवा ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार दाखले

 

निकालानंतर शाळा, कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांची सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने प्रशासनाला दाखले देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांच्यात वाद होतात.

प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रांत हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आत्ताच दाखल्यांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार दाखले

Leave a Comment