तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी.! हा व्यवसाय करा सुरू सरकार देणार व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 लाख रुपये, इथे करा अर्ज

पीएम जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज प्रक्रियेदरम्यान विशेष श्रेणी आणि विशेष क्षेत्राशी संबंधित अर्जदारांना या शुल्कात सूट देण्याची तरतूद देखील आहे. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडल्यानंतर सरकारकडून प्रोत्साहन रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 5 लाख रुपये किंवा कमाल 15,000 रुपयांपर्यंतच्या औषधांच्या मासिक खरेदीवर 15 टक्के प्रोत्साहन देण्याचा नियम करण्यात आला आहे. विशेष श्रेणी किंवा क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून सरकारकडून अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून या केंद्रासाठी 2 लाख रुपयांची एकरकमी रक्कम देखील दिली जाते.

असा करा अर्ज (How to apply online)
सर्वप्रथम अधिकृत janaushadhi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवरील मेनूमधील Apply For Kendra या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पानावर Click Here To Apply पर्यायावर क्लिक करा.
आता Sign in फॉर्म उघडेल, त्याच्या खाली Register now पर्याय निवडा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल, त्यात आवश्यक माहिती भरा.
यानंतर ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी-पासवर्ड सेक्शनमध्ये कन्फर्म पासवर्ड प्रविष्ट करा.
आता नियम आणि अटींवर टिक करा आणि नंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
या सोप्या स्टेप्स फॉलो करन तुम्ही PM जन औषधी केंद्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.