नमस्कार मित्रांनो देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाराणसी येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे.
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीद्वारे देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केल्यानंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी 7 वाजता दशाश्वमेध घाटावर आयोजित गंगा आरतीला उपस्थित राहतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला.
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
तेव्हापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.