सिबील स्कोअर आणि सिबील रिपोर्ट म्हणजे काय?
जिल्हा बँकेकडून कर्ज देताना प्रत्येक शेतकऱ्याचा सिबील रिपोर्ट तपासला जातो. सिबील स्कोअर आणि सिबील रिपोर्ट यात फरक आहे.
शेतकऱ्याने आणखी कुठे कर्ज घेतले आहे का?, त्याच्या उताऱ्याावर बोजा आहे का? याची तपासणी केली जाते. जिल्हा बँके व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचा बोजा असला तर त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारले जाते. खासगी बँका मात्र सिबील स्कोअर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, जिल्हा बँक मात्र कर्ज देते.
सिबीलला बसू शकतो फटका
जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही आणि ते बुडाले तर केवळ त्याच्या सिबील स्कोअरवर परिणाम होत नाही तर, कर्जासाठी जामीन राहिलेल्या व्यक्तीच्या सिबील
स्कोअरवर देखील परिणाम होतो.
परिणामी, जर भविष्यात जामीनदाराला कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
जामीनदार होताना काय काळजी घ्याल?
ज्याच्या कर्जासाठी तुम्ही जामीन राहणार आहात तो कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहे, तो का आणि किती कर्ज घेत आहे. कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता आहे का, जर कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती भरू शकला नाही तर, त्याच्याकडे अन्य काही मालमत्ता आहे का, की ज्याची विक्री करून तो कर्जाची परतफेड करू शकतो, अशा सर्व मुद्दयांचा विचार करूनच जामीनदार व्हावे.
कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर जामीनदाराची ती जबाबदारी असते. सिबील स्कोर ७५० पेक्षा जास्त असावा. जास्तीत जास्त वेळा कर्ज घेणे, त्याची नियमित फेड करणे यामुळे सिबील स्कोअर चांगला होतो. खासगी बँका मात्र सिबील स्कोअर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, जिल्हा बँक मात्र कर्ज देते.