नमस्कार मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना देशाचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley)यांनी लॉन्च केलेली केंद्र सरकारची (Central Govt)योजना आहे. या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंपउपलब्ध करुन शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे
योजनेचा लाभ कसा मिळतो?
– सरकारकडून शेतकर्यांना 60 टक्के अनुदान दिले जाते.30 टक्के खर्च हा सरकार कर्ज स्वरुपात देते.
शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. या योजनेंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करु शकतो.
इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा
योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार. बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असणार आहेत.
2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC, 5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC, 5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषीपंप यांसाठी अनुदान देय असेल