नमस्कार मित्रांनो 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठ गाव-खेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
सुरुवातीला सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती.
पण ज्यांना अजून अर्ज भरता आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बंद केले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती. पण नंतर ती वाढवण्यात आली आहे. ‘नारी शक्ति दूत’ या ॲपमधून योजनेसाठी आधी अर्ज करत येत होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जात होते. पण आता ते बंद झाले आहे. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातील अॅपद्वारे अर्ज भरताना देखील तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर सरकारने www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली. नारी शक्ति दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना “NO NEW FORM ACCEPTED ” असा मेसेज येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविका यांना संपर्क करण्याचा मेसेज येत आहे.