शेतकऱ्यांसाठी बातमी.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा धोका

नमस्कार मित्रांनोगेल्या काही दिवसांपासून देशात अनेक राज्‍यांत पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येक राज्यात पावसाने आपले वेगवेगळे रूप धारण केले आहे.

त्यातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

३० जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत छत्तीसगड, कोकण, मध्य प्रदेश आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत दक्षिण छिंदवाडा, दक्षिण सिवनी, नीमच, मंदसौर, गुना, निवारीसह मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 २८ ते ३१ जुलै पर्यंतच्या चार दिवसात संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता (Rain) कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यात जाणवते. गुरुवार दि.१ ऑगस्टपासून मात्र पुन्हा जोरदार पावसाची शक्यता मात्र ह्या जिल्ह्यात जाणवते. मराठवाड्यातील  ८ जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ३ ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते.

हे सुद्धा बघा : 12वी पास उमेदवारांसाठी निघाली स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती येथे करा अर्ज

Leave a Comment