तालुक्यातील सर्वच मंडलात २५ दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला. बहुतांशी शेतकऱ्यांना उत्पादनात शंभर टक्के नुकसान झाले असून, सरासरी विचार केला, तरी हंगामातील उत्पादन जवळपास ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.
पीकविम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल, तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.