1 सप्टेंबर पासून घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त हा नवीन नियम होणार लागू

आता स्कूटर असो की बाईक, मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार आहे. हा नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. मात्र, हा नियम मोटार वाहन कायद्यांतर्गत आधीच लागू आहे. मात्र अनेक शहरांमध्ये याचे पालन केले जात नाही. अशा परिस्थितीत या नियमात कठोरता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला १०३५ रुपयांचे चलन बजावले जाईल. तसेच परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडर आणि तेल कंपन्या त्यांच्या दर यादीत सुधारणा करतात. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.