घरबसल्या हे जॉब करून तुम्ही कमवू शकता महिन्याला लाखो रुपये

डिजिटल मार्केटिंग तज्ञ

आजकाल डिजिटल मार्केटिंग खूप विस्तारले आहे. तुम्ही घरबसल्या विविध क्षेत्रात जाहिरात आणि प्रचार करू शकता. यासाठी संपूर्ण नियोजन आवश्यक आहे. ही व्यक्ती ई-मेल कॅम्पेन तसेच सोशल मीडिया, वेबसाईट अशा प्रत्येक गोष्टीवर काम करते. त्यामुळे तुम्ही डिजिटल तज्ञ असाल तर तुम्ही घरी बसून चांगले पैसे कमवू शकता

 

ग्राफिक डिझायनर

सध्या ग्राफिक डिझायनरला खूप जास्त मागणी आलेली आहे. अनेकवेळा आपण आपल्या व्यवसायाची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची जाहिरात ही सोशल मीडियावर करतो. त्यासाठी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ग्राफिक्स डिझाईन करणे खूप गरजेचे असते. यामध्ये विविध प्रकारचे लोगो, ब्राउझर्स, पोस्टर डिजिटल ग्राफिक्स करतात. वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट उपलब्ध करून तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राफिक करू शकता. तुम्ही जर ग्राफिक डिझाईन असाल, तर तुम्हाला घरबसल्या खूप चांगली कमाई करता येईल.

 

प्रोजेक्ट मॅनेजर

प्रोजेक्ट मॅनेजरवर विविध प्रकल्पाचे काम व्यवस्थित पाहणे कामावर नियंत्रण ठेवणे आणि एखादा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी असते. या मॅनेजरच्या हाताखाली एक संपूर्ण टीम काम करत असते. परंतु त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरकडे उत्तम संवाद कौशल्य, नियोजन कौशल्य हे गुण असणे गरजेचे आहे