जिओच्या ग्राहकांना खुशखबर.! इतके दिवस मिळणार आता मोफत इंटरनेट

Jio ने ५० दिवस मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत. कंपनीने Jio True5G वापरकर्त्यांसाठी ही ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या कनेक्शनवर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ 5G नेटवर्क वापरत असाल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

यासोबतच मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ५९९ रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करावे लागेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6 किंवा 12 महिन्यांचा रिचार्ज पॅक एकाच वेळी घ्यावा लागेल. या ऑफरची अंतिम मुदत फक्त 30 एप्रिलपर्यंत आहे जर तुम्ही तुमच्या Jio Air Fiber मध्ये 599 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केले तर तुम्ही 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट सेवा घेऊ शकाल.