नमस्कार मित्रांनो राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुके आणि दुष्काळग्रस्त महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे.
पाच ते सहा वेळा मुदत वाढवूनही दोन्ही वर्गातील पाच लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थ्यांची माहिती आतापर्यंत प्राप्त झाल्याचे मंडळाने म्हटले आहे. त्यावर सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
हे सुद्धा बघा : 8 वी पासवर निघाली मुंबई नेव्हल डोकयार्ड अंतर्गत मोठी भरती,येथे करा लगेच अर्ज
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून 198 तालुक्यांतील 1,021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा शुल्क माफीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाकडे ऑनलाइन सादर करावी लागणार आहे. त्यानुसार मंडळाने वारंवार आवाहन केले आणि पाच-सहा मुदत उलटूनही अद्याप विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती मंडळापर्यंत पोहोचलेली नाही. ही परिस्थिती पाहता ही मुदत आणखी काही दिवस वाढवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा बघा या दिवशी शेतकऱ्यांच्या खातात तुम्हाला पैसे जमा इथे बघा यादीत आपले नाव
आतापर्यंत दहावीच्या तीन लाख ३७ हजार ४४ विद्यार्थ्यांकडून मंडळाला माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, महाविद्यालयांनी बारावीच्या 2 लाख 38 हजार 515 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाकडे सादर केली आहे. याशिवाय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी यासंदर्भातील माहिती उच्च शिक्षण विभागाकडे सादर केली आहे