नमस्कार मित्रांनो जानेवारी ते मे या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 596 कोटी 21 लाख रुपयांची मदत देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
हे सुद्धा वाचा लाडकीबहिण योजनेसाठी नवीन वेबसाईट झाली सुरू अशा प्रकारे करा अर्ज
अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज पडणे, समुद्राच्या लाटा, अचानक आग अशा स्थानिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीसाठी 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत सुधारित दराने सहाय्यता रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
जानेवारी ते मे 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी करणारे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित केला जाईल.