नमस्कार मित्रांनो सिबील स्कोअर कमी असला तर कोणतीच बँक कर्जाला उभी करत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र जिल्हा बँक सिबील स्कोअर कमी किंवा शून्य असला तरी कर्ज देत आहे.
शेतकऱ्यांचा सिबील स्कोअर तपासू नये असे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. या आदेशाचे जिल्हा बँकेकडून पालन केले जात आहे. दरम्यान, कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहणे आता धोक्याचे ठरू शकते. सिबील स्कोअरलाही फटका बसू शकतो.
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आदी आर्थिक संस्थांकडून दिलेल्या कर्जाच्या हमीसाठी जामीनदार आणण्यास सांगितले जाते.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार कर्ज
असा जामीनदार आणायची जबाबदारी ही कर्जदाराचीअसते. जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी दुसऱ्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमती देत असते आणि जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही, तर त्या कर्जासाठी ती एकप्रकारे जबाबदारही असते. त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते.