महिलांसाठी खुशखबर.! लेख लाडकी योजनेचा पहिला हप्ता झाला खात्यात जमा इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

नमस्कार मित्रांनो बेटी पढाओ बेटी पढाओ, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1.01 लाख रुपये दिले जातील. योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून, 318 जणांच्या खात्यावर पाच हजारांचा पहिला हप्ताही जमा झाला आहे. त्यामुळे 600 ‘लेक’च्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

 

हे सुद्धा वाचा या यादीत नाव असेल तर खात्यात होणार 1 लाख 20 हजार रुपये जमा

 

ही योजना राज्यात 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (DBT) द्वारे लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. 1 एप्रिल 2023 नंतर एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांना ही योजना लागू आहे. यामध्ये एकुलती एक मुलगी असलेल्यांचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांना दोन्ही मुली आहेत ते या योजनेसाठी पात्र असतील. ग्रामीण भागातील या ‘लेक लाडकी’ योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षकांवर आहे.

शहरी भागात ते मुख्य सेवकांसाठी असते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला या योजनेसाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यापैकी सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप करण्याचे विभागाचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर 5 हजार रुपये मिळणार आहेत. मुलीला इयत्ता 1 मध्ये जाण्यासाठी 6,000 रुपये, इयत्ता 6 वी मध्ये जाण्यासाठी 7,000 रुपये आणि 11 व्या वर्गात गेल्यावर 8,000 रुपये मिळतील. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला 75 हजार रुपये आणि एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळतील. .लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 318 मुलींच्या संयुक्त बँक खात्यावर प्रति लाभार्थी 5 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. लवकरच 600 मुलींनाही योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.

Leave a Comment