नमस्कार मित्रांनो कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषीपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजने’मुळे झाली आहे.
आगामी काळात सौर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल,
असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे आणि पोस्टरचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला.