सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! आजपासून गॅस सिलेंडर झाले इतक्या रुपयांनी स्वस्त, इथे बघा आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले. त्यानुसार एलपीजी सिलिंडर सुमारे 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज सकाळपासून नवीन दर लागू झाले आहेत. यामुळे महागाईशी झगडणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधनाचे नवीन दर जाहीर केले जातात.

 

हे सुध्दा वाचा आजपासून महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात येथे करा अर्ज

 

आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 30 ते 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1598 रुपये झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत 1646 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर 1840.50 रुपयांऐवजी 1809.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे सिलिंडरची किंमत 1756 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सलग चौथ्या महिन्यात कमी झाली आहे. या काळात चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 150 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर कायम आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी 802.50 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या 10 महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे 300 रुपयांची कपात केली आहे. अशा परिस्थितीत नजीकच्या भविष्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल अपेक्षित नाही. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment