आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद चालू करण्यासाठी त्वरित करा हे काम

नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीनही पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या घरगुती गॅस सिलिंडर धारकांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे.

मात्र अनेक ग्राहकांना याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील 25 लाख ग्राहकांपैकी 25 टक्के ग्राहकांनी केवायसी पूर्ण केले असून त्याची अंतिम मुदत 25 जुलै आहे. अशा परिस्थितीत आता घरगुती सिलिंडरधारक ‘गॅस’वर आहेत. केवायसी न केल्यास सवलतीच्या दरात सिलिंडर मिळणे कठीण होईल.

इतक्या कमी वेळेत सुमारे 19-20 लाख ग्राहकांचे केवायसी पूर्ण करणे अशक्य आहे. बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा किंवा फोटो देऊन संबंधित वितरकाच्या कार्यालयात जाऊन केवायसी करावे लागेल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमचे मिळून पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे सहा लाख घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. पुणे परिसरात एकूण संख्या सुमारे 25 लाख आहे

 

हे सुध्दा बघा : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या दिवशी होणार खात्यावर अनुदानाची रक्कम जमा

Leave a Comment