मोदी सरकारने कामगारांना दिली मोठी भेट.! आता दर महिन्याला मिळणार 26 हजार रुपये पगार

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील कामगारांना मोठी भेट देऊन दिवाळी आणखी गोड केली आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी परिवर्तनीय महागाई भत्ता म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे.

आणि त्यांना देण्यात येणारा किमान वेतन दर 1,035 रुपये प्रतिदिन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दर महिन्याला कामगारांच्या हातात किती पैसे येतील ते जाणून घेऊया.कामगारांच्या विविध श्रेणीनुसार किमान वेतन दरात सरकारने केलेल्या नवीन बदलांनंतर आता अर्धकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर 868 रुपये प्रतिदिन करण्यात आला असून त्यांना दरमहा 22,568 रुपये मिळणार आहेत. कुशल कामगार, लिपिक आणि नि:शस्त्र वॉचमन किंवा रक्षक यांना त्यांचे किमान वेतन 954 रुपये प्रतिदिन करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे मासिक मानधन आता 24,804 रुपये प्रति महिना असेल. उच्च कुशल कामगारांना आता दरमहा 26,910 रुपये मिळणार असून, त्यांचे किमान वेतन प्रतिदिन 1035 रुपये करण्यात आले आहे.

हे सुद्धा बघा : लाडकी बहिण योजनेचे 4500 हजार रुपये महिलांच्या खात्यात झाले जमा इथे क्लिक करून नाव तपासा

Leave a Comment