असे शोधा महा ई-सेवा केंद्र
घराजवळील महा ई-सेवा केंद्रामध्ये आता दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातूनच दाखले देण्यात येणार आहे. या केंद्रांची यादी aapalesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर ‘संपर्क’ यावर क्लिक केल्यावर आपला जिल्हा आणि तालुका निवडा. यामध्ये सर्व महा ई-सेवा केंद्रांची यादी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये केंद्राचा पत्ता, ई-मेल आयडी आणि फोन नंबर असेल. यावरून संबंधित अर्जदाराला जवळचे महा ई-सेवा केंद्र शोधता येणार आहे.