आता जुने कोणतेही कागदपत्रे मिळणार मोबाईलवर फक्त एका क्लीकवर, अशाप्रकारे मिळवा कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे.

ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील.ई- रेकॉर्डस संग्रहित दस्तावेज प्रणालीमध्ये शेती संबंधित जुने दस्तावेज यात जुने सातबारा, फेरफार, पेरेपत्रक, हक्क नोंदी उतारा पाहणे आणि शोधण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या लिंकवर जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून जिल्हा, तालुका, गाव व गट क्र. निवडून आपल्याशी संबंधित जुने दस्तावेज पाहता येतील.

 

हे सुद्धा वाचा : लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट झाली सुरू, आता असा भरा ऑनलाईन अर्ज

 

तसेच शेतकरी आणि नागरिक, तसेच आपले सरकार केंद्र, बँक प्रतिनिधींकरिता ई-हक्क प्रणालीमध्ये शेतीजमीन बाबतीत ऑनलाइन फेरफार अर्ज दाखल करण्यासाठीpdeigr.maharashtra.gov.in/frmLogin लिंकवर जाऊन आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून विहित माहिती भरावी लागणार आहे.यात एकूण ११ प्रकारच्या ऑनलाइन फेरफारकरिता अर्ज ई-हक्क प्रणालीवर करता येतील. यात ई-करार, बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, एकुमें नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, खातेदाराची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारामधील तफावत दुरुस्ती करणे, मयत कुळाची वारस नोंद या सेवा असणार आहे.

Leave a Comment