शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत वीज

नमस्कार मित्रांनो राज्यातील ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णत मोफत वीज देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.या योजनेसाठी सुमारे १४ हजार ७६१ रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहेत. ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजने’अंतर्गत हे अनुदान दिले जाणार आहे. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान पुढेही सुरूच राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

हे सुद्धा वाचा सरकार करणार तुमच्या मुलांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा आजच करा येथे अर्ज

 

राज्याचा २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडला.शेतीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मदतीचा हात सरकारने पुढे केला आहे. राज्यातील नोंदणीकृत दोन लाख ९३ हजार दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपयाप्रमाणे २२३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत करण्यात येणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

Leave a Comment