केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता या नागरिकांना सुद्धा मिळणार आयुष्मान कार्डाद्वारे मोफत उपचार

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांना एक मोठी बातमी दिली आहे. आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांवर या योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष 2019 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत लॉन्च केला होता. ही देशव्यापी आरोग्य योजना आहे. याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हणतात. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मोठ्या आजारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

 

हे सुद्धा वाचा या विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बस मध्ये मोफत प्रवास

 

भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा उल्लेख केला होता. आजारपणात उपचार कसे करायचे हा वृद्धांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. मध्यमवर्गीयांसाठी ही चिंता अधिक गंभीर आहे. मोदी म्हणाले होते, म्हणूनच भाजपने ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेत आणण्याचा संकल्प केला आहे.

Leave a Comment