नमस्कार मित्रांनो देशात अजूनही खासगी सावकार आणि पतपेढीतून कर्ज घेण्याचे प्रमाण मोठं आहे. या कर्जाच्या महागड्या व्याजाखाली लोक दबून जातात. पण, त्यांच्याकडे पर्याय नाही. कारण, सरकारी किंवा खाजगी बँकेत कर्ज मिळवण्यासाठी कित्येक महिने चपला घासाव्या लागतात.
तरीही कर्ज मिळेल याची शाश्वती नसते. कुठलेही कारण देऊन बँक कर्ज नाकारू शकते. कर्ज मंजूर न होण्याची मुख्य कारणे खराब क्रेडिट स्कोर, कागदपत्रांची कमतरता इ. असू शकतात. आता ही सर्व कटकट थांबणार असून यासाठी खुद्ध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. या समस्या लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यावर उपाय शोधला आहे. वास्तविक, आरबीआयने एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (ULI) असे या प्लॅटफॉर्मचे नाव आहे. हा डिजिटल प्लॅटफॉर्म लोकांसाठी कर्ज जारी करण्याची प्रक्रिया सोपी करणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे लोक कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे कर्ज घेऊ शकतात.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (ULI) लाँच केले आहे.
ULI कर्जदाराशी संबंधित आवश्यक माहिती एकाच ठिकाणी संग्रहित करते. यामध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक आणि गैर-आर्थिक माहितीचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता एकाच ठिकाणी दिसून येते, ज्यामुळे कर्ज देणे सोपे होईल. हे व्यासपीठ लहान व्यवसाय आणि ग्रामीण कर्जदारांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यात चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये दास यांनी सांगितले की, देशाला महागाई आणखी वाढणे परवडणारे नाही. ते म्हणाले की, सध्याचा सर्वोत्तम दृष्टीकोन म्हणजे लवचिक दृष्टीकोन स्वीकारणे आणि मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्यानुसार चलनवाढ टिकून राहण्याची प्रतीक्षा करणे. त्यामुळे सध्यातरी व्याजदर स्वस्त होण्याची अपेक्षा मावळली आहे.