पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी.! आता पेन्शनधारकांना मिळनार कोणत्याही बँक शाखेत पेन्शन

नमस्कार मित्रांनो आता शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. नागरिकांना पेन्शन घेण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

पेन्शनधारक आता कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेवु शकतील. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री आणि ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. मनसुख मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ साठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीच्या (सीपीपीएस) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.या निर्णयाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीची मंजुरी हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिली खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार इतके रुपये निधी वितरित

यामुळे निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे पेन्शन कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, देशात कुठेही उचलता येईल. केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमचा ७८ लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. पेन्शन धारकांसाठी ही सुविधा प्रगत आयटी आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. अधिक कार्यक्षम, अखंड आणि वापरकर्त्यास अनुकूल अनुभव प्रदान करणारी ही सुविधा असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment