नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते.
महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची सुरुवात केली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली हे. याचसोबत दुसऱ्या शहराक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतर्ख राहण्याची सुविधा दिली जाते.
हे सुद्धा बघा : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवीन दर झाले जाहीर येथे जाणून घ्या आजचे नवीन दर
स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच तुम्ही जर दहावी किंवा बारावीनंतर कोणत्याही कोर्समध्ये अॅडमिशन घेत असाल तर त्याला कालावधी २ वर्षांपेक्षा जास्त असावा. तसेच विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. या योजनेत लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे स्वतः चे बँक अकाउंट असावे.स्वाधार योजनेअंतर्गत बोर्डिंगच्या सुविधेसाठी २८ हजार रुपये दिले जातात. लॉजिग सुविधेसाठी १५ हजार रुपये दिले जातात. तसेच मेडिकल, इंजिनियरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पाच हजार रुपये मिळतात.या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर होम पेजवर असलेला स्वाधार योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर जवळील समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागेल.
यानंतर तुमची अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.
हे सुद्धा बघा : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवीन दर झाले जाहीर येथे जाणून घ्या आजचे नवीन दर