नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र्य आणि शाश्वत सोय होणार आहे. सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाच सिंचनाची सोय होईल.
त्यामुळे रात्रीच्यावेळी आंधारात सिंचनासाठी धावपळ करण्याची गरज राहाणार नाही. सौर कृषीपंपामुळे वीजबिलाचीही कटकट राहाणार नसून वीजपुरवठ्यातील अखंडितपणाचाही फ़ायदा होणार आहे. सौर पंपाला पाच वर्षांचे देखभाल आणि दुरुस्तीचेही विमा संरक्षण असणार आहे.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 4500 रुपये
केवळ दहा टक्के रक्क्म भरुन सौरपॅनेल व कृषीपंपाचा पूर्ण संच या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के रक्कमेचा आहे. ऊर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकाकडून अनुदान स्वरुपार असेल. जमिनीच्या क्षेत्रफ़ळानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप योजनेत दिले जाणार आहेत.
वीज जोडणीची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in किंवा solar_MTSKPY/index.php या संकेत स्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.
हे सुद्धा बघा : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 4500 रुपये