शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने केले 50 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात आली.

त्या योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आले असून, आतापर्यंत १९ कोटी ८४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. अद्यापही ३६६ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकीत कर्जदारांचे कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मध्यंतरी या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये खात्यात आले नसेल तर तात्काळ करा हे काम लगेच होणार पैसे जमा

Leave a Comment