लाडकी बहीण योजनेननंतर तुमच्या मुलींच्या खात्यात सरकार करत आहे 5 हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गरीब कुटूंबांच्या मुलींना लखपती बनविण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी आतापर्यंत 50 लाख रुपयांचा निधीचे वाटप केले आहे. अर्जाची संख्या मोठी असल्याने शासनाने पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागास दिला आहे. अर्जाची छाननी सुुरु आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणार्‍या एक किंवा दोन मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा बघा : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये नवीन यादी जाहीर

एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली.पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना पहिल्या हप्तापोटी पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, 11 वीत गेल्यावर आठ हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

हे सुद्धा बघा : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये नवीन यादी जाहीर

Leave a Comment