नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात शेतकरी हिस्सा केवळ एक रुपया देऊन सर्वंकष पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात भात, नाचणी आणि उडीद पिके या योजनेअंतर्गत अधिसूचित आहेत. या विमा योजनेत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांचा हिस्सा राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा या तारखेला होणार लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये जमा इथे क्लिक करून बघा
या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने आपली सत्ताबारा प्रत, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषित फॉर्म सोबत घेऊन अधिकृत बँकेत विम्यासाठी अर्ज करून हप्ता भरावा. पेमेंटची पावती तुमच्याकडे ठेवा. C. S. C केंद्रातील तुमच्या सरकारी पोर्टलच्या मदतीने विमा योजनेत सहभागी होऊ शकता अन्यथा www.pmfby.gov.in पोर्टल वापरू शकता. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.