योजनेत सहभागी होण्याची पात्रता
उमेदवाराचे वय किमान १८ ते ३५ पर्यंत असावे
शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवी पूर्ण असावी
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याची आधार नोंदणी असावी
उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी
काही दिवसांत सुरू होईल योजनेची अंमलबजावणी
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता सुरू करण्यात आली आहे. त्याची कार्यपद्धती काही दिवसांत निश्चित झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.