नमस्कार मित्रांनो सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी तर काही तरुण पिढीसाठी आहेत. केंद्र सरकारने तरुणांसाठी अशीच एक योजना राबवली होती.
ज्यात तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.याबाबत सरकारने अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली होती.देशभरातली तरुणांना नोकरीची संधी मिळावी, त्यांना चांगल्या कंपनीत काम करता यावे, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्हीला ट्रेनिंग दिले जाईल. त्याचसोबत स्टायपेंडदेखील दिले जाईल.बजेट २०२४ मध्ये इंटर्नशिप स्कीमची घोषणा करण्यात आली होती. मिडिया रिपोर्टनुसार, सरकार लवकरच या योजनेबाबत गाइडलाइन्स जारी करणाप आहे. पुढच्या आठवड्यात याबाबत घोषणा होऊ शकते. त्यासोबत या योजनेसाठी एक पोर्टलदेखील सुरु करता येईल.इंटर्नशिप प्रोग्राम हा स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी राबवण्यात येणार आहे.
या योजनेत अनेक तरुणांना कंपनीमध्ये ट्रेनिंग देऊन नोकरीसाठी तयार केले जाईल. या योजनेत तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत होईल.या योजनेत इंटर्न असलेल्या तरुणांना स्टायपेंड दिली जाणार आहे. योजनेत तरुणांना ५,००० रुपये दिले जाणार आहे. तसेच CSR फंडसाठी कंपन्याना ५०० रुपये दिले जाईल.तसेच ४,५०० रुपये सरकारकडून दिले जाईल.याचसोबत सरकार प्रत्येक इंटर्नला ६,००० रुपयांचे वन टाइम पेमेंट देईल.