नमस्कार मित्रांनो सरकारच्या या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ) नागरिकांना दरवर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. शेतीतील कामांसाठी हे पैसे उपयोगाला येतात. परंतु आता सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे.
सरकारने आता पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखांची मदत केली जाणार आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या पीएम किसान एफपीओ (PM kisan FPO Yojana ) योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत 11 शेतकऱ्यांच्या गटाला सरकारमार्फत शेती संबंधित स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचे नाव पीएम किसान फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असे आहे.
हे सुद्धा बघा : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत करतात. या आर्थिक मदतीतून शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत कोणत्याही एका शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ मिळणार नाही. अकरा शेतकऱ्यांच्या गटाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शकता तुम्ही. पीएम केसांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळेल.
हे सुद्धा बघा : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय