नमस्कार मित्रांनो तुम्हालाही नोकरीची गरज असल्यास तुम्ही त्यासाठी अर्जही करू शकता. योजनादूतचा अर्थ काय आहे योजनादूत असे या पदाचे नाव आहे.
प्रत्येक गावात या पदांसाठी तरुणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त केलेल्या उमेदवारांना सरकारकडून दरमहा 10,000 रुपये मानधन दिलेजाईल.
ही नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली जाणार आहे. सहा महिन्यांनंतर उमेदवाराला प्रमाणपत्रही दिले जाईल. योजनादूतला कोणते काम करावे लागते? या योजनेत नियुक्त केलेल्या लोकांना सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी लागणार आहे. या योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. लोकांना लाभ मिळेपर्यंत घरोघरी जाऊन माहिती देऊन मदत करावी लागेल. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र MSCIT प्रमाणपत्र अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी, तुम्हाला mahayojanadoot.org या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.