पूर्व विदर्भात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. पुढील ४ दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे बागांसह शेतीचे नुकसान झाले आहे.
पुढील चार दिवसांचा अंदाज.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. IMD च्या अंदाजानुसार 12 मे पर्यंत पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, नांदेड येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडणार आहे.