सरकारचा मोठा निर्णय.! कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली इतक्या हजारांची मोठी वाढ

नमस्कार मित्रांनो ऐन गणेशोत्सवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

तो म्हणजे राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगाराच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.या तीनही कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत. त्यांना 19% वेतन वाढ सरकारने जाहीर केलेली आहे. ही वेतन वाढ आता मार्च 2024 पासून मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना मार्च 2024 पासूनची थकबाकी देखील आता मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली होती. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही वेतन वाढ केली होती. त्यानंतर आत्ता जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. तेव्हा देखील त्यांनी 19 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेतन मिळणार आहे.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या दिवशी होणार खात्यात जमा इथे बघा लाभार्थी यादी

Leave a Comment