नमस्कार मित्रांनो सरकारने विविध खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कामध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
खाद्यतेलाच्या १५ लिटर डब्याच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलही महागले असल्याने सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.या तेलांवर आयात शुल्क वाढलं पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने कच्चे आणि शुद्ध सूर्यफूल तेलासह इतर काही खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, कच्चे आणि शुद्ध पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल बियाणे तेलावर बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) वाढवण्यात आली आहे.
हे सुद्धा बघा : सुकन्या समृद्धी योजनेत बदल आता या मुलींच्या खात्यात सुद्धा होणार पैसे जमा
अहवालानुसार, कस्टम ड्युटी वाढल्यामुळे, सर्व संबंधित खाद्यतेलांवरील एकूण प्रभावी शुल्क दर ३५.७५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल बियाणे तेलावरील प्रभावी शुल्क दर आता ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर शुद्ध सूर्यफूल बियाणे तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलावर प्रभावी शुल्काचा दर आता १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के झाला आहे.
हे सुद्धा बघा : सुकन्या समृद्धी योजनेत बदल आता या मुलींच्या खात्यात सुद्धा होणार पैसे जमा