नमस्कार मित्रांनो भारत सरकारने आधार कार्डविषयक नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आधार कार्डावरचं नाव आणि जन्मतारीख यात बदल करणं आता आणखी अवघड झालं आहे.
पूर्वी आधार कार्डवर नाव आणि जन्मतारीख बदलणं सहज शक्य होतं. आता ती प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे ज्यांचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डावर नोंदवताना काही चूक झाली आहे, त्यांच्यासाठी ती चूक सुधारणं डोकेदुखी ठरणार आहे.
यापुढे आधार कार्डावरची जन्मतारीख किंवा नाव चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. यापूर्वी असं कोणतंही कागदपत्र न सादर करताही अशा चुका दुरुस्त करता येत असत. आता नियम कडक करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात अनेक महिलांकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट नसण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्यांना आधार कार्डावरची माहिती अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : रेशन धारकांसाठी मोठी माहिती.! आता या लोकांना मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ