जिओने ग्राहकांसाठी आणला जबरदस्त प्लान आता जिओ देणार इतके दिवस मोफत डेटा

जिओने आपल्या हिरो प्लॅन्समध्ये (Hero Plans) एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत ३४९ रुपये आहे. ज्यांना कमी वेळेत जास्त डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे आणि यामध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही मर्यादेशिवाय कॉल करू शकता.

या प्लॅनमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज २ जीबी डेटा मिळेल. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ५ जी डेटा देखील मिळेल, जर तुमच्या परिसरात ५ जी असेल तर तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. याशिवाय, जिओ सिनेमाचे मोफत सबस्क्रिप्शन, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत वापर या प्लॅनमध्ये मिळत आहे.