सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर, या योजनेचा लाभ घेण्यासाठी, केवळ नारी शक्तीदूत ॲपवर अर्ज करता येईल. मात्र योजना जाहीर झाल्यानंतर अनेकवेळा सर्व्हर डाउन, लोडमुळे वेबसाइट बंद पडणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. यामुळे सरकारने नवीन वेबसाइट सुरू केली आहे. आता महिला हा फॉर्म घरबसल्या ऑनलाइन भरू शकतात. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाइट आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिल