नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी या नागरिकांना मिळणार नाही नवीन सिम कार्ड

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापुढे टेलिकॉम कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही.

तुम्ही स्वतः तुमच्या सिम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करू शकाल. दूरसंचार विभागाने (DoT) आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच, युजर्सना नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभागाचा हा नवा नियम युजर्सच्या वैयक्तिक कागदपत्रांसोबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी आहे.

हे सुद्धा बघा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 जागांसाठी मोठी भरती इथे क्लिक करून भरतीची अर्ज प्रक्रिया बघा

तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या टेलिकॉम रिफॉर्म करत असताना, आता युजर्ससाठी ई-केवायसी (नो युवर कस्टमर) सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे.

प्रीपेड वरून पोस्टपेड नंबर बदलण्यासाठी युजर्सना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. युजर्स आता OTP म्हणजेच वन टाईम पासवर्डवर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील. युजर्स कोणतीही फोटोकॉपी किंवा डॉक्युमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकतात. दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे युजर्सच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. त्यामुळे आता कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही.

हे सुद्धा बघा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 जागांसाठी मोठी भरती इथे क्लिक करून भरतीची अर्ज प्रक्रिया बघा

Leave a Comment