नमस्कार मित्रांनो आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी कुटुंबियांसाठी पीओएस मशीन द्वारे नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे आवश्यक आहे.
याद्वारे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांची ई-केवायसी बायोमेट्रिक तपासणी केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आलेले आहे.
आणि त्यांच्या आदेशाचे पालन केले बंधनकारक केलेले आहे.केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे लोक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना इथून पुढे राशन दिले जाणार नाही. तसेच जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर तुमचे राशन कार्ड देखील रद्द केले जाईल. संपूर्ण राज्यात रेशन दुकानात ई केवायसी करण्यासाठी सध्या गर्दी पाहायला मिळत आहे.
हे सुद्धा बघा : ऑनलाइन वीज भरणाऱ्यांसाठी मिळणार आता इतक्या रुपयांची सूट
परंतु जर अजूनही तुम्ही केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागेल. तुमचे एक केवायसी आधार कार्ड लिंक झाल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेतले जाईल. सरकारकडून 30 सप्टेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही ई केवायसी केले नाही, तर तुम्ही यांपासून वंचित रहा त्यामुळे आता लवकरात लवकर करून घ्या.हाती आलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई केवायसी केले नाही. तर तुम्ही पुढील महिन्यात धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे ई केवायसी करणार नाही. त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
हे सुद्धा बघा : ऑनलाइन वीज भरणाऱ्यांसाठी मिळणार आता इतक्या रुपयांची सूट