नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून अर्ज दाखल केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता-भगिनींपर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.